• Tue. Aug 16th, 2022

  अकरावीसाठी ४,५00 विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश अर्ज

  ByKhandeshTimes

  Aug 21, 2021

  अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता मेरीटनुसार प्रवेशप्रक्रियेसाठी मेरीट अर्ज नोंदणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली.शहरातील २१ महाविद्यालयांत ही नोंदणीप्रक्रिया सुरू केली आहे . ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत . पहिल्याच दिवशी साडेचार हजार अजांची विक्री झाली . त्यात सर्वाधिक मूळजी जेठा महाविद्यालयातून दोन हजार प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांनी घेतले . अर्ज स्वीकारण्याची मुदत मंगळवारपर्यंत वेळापत्रकानुसार २७ ऑगस्टला पहिली गुणवत्तायादी जाहीर होईल . तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालयांत शुक्रवारी प्रवेशप्रक्रियेसाठीमोठ मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून आली . मूल्यमापनावर आधारित दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे . विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी नामांकित महाविद्यालयांत आता गर्दी होऊ लागली आहे . प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मेरीट फॉर्म भरण्याची व्यवस्था महाविद्यालयांनी उपलब्ध करून दिली . अनेक महाविद्यालयांत विज्ञान व वाणिज्य शाखेसाठीच अधिक मेरीटची गरज लागणार आहे . कला शाखेसाठी मेरीट नसून , प्रवेश सुरू आहेत .

  या महाविद्यालयांत चढाओढ : शहरातील केसीई सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ,
  जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था संचलित नूतन मराठा महाविद्यालय , अॅड . बबनराव बाहेती महाविद्यालय , डॉ . जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय , धनाजीनाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचलित शिरीष चौधरी विज्ञान महाविद्यालय , एसएनडीटी महिला महाविद्यालय येथे विज्ञान व वाणिज्य शाखेच्या मेरीटसाठी वरचढ होणार आहे . प्रवेशप्रक्रिया सुरळीत व्हावी , यासाठी महाविद्यालयांत स्वतंत्र काऊंटर लावून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत . नोंदणीत दिव्यांगांनाप्राधान्यः पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी मेरीट अजांची विक्री मोठ्याप्रमाणात झाली . विज्ञान शाखेसाठी १२०० , वाणिज्य ६५० व कला शाखेसाठी १५० अजांची विक्री झाली . पुढील तीन दिवसांत अर्ज जमा केले जाणार आहेत . क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्य , दिव्यांग विद्यार्थ्यांना नोंदणीत प्राधान्य दिले जात आहे . प्रवेशप्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब होणार नाही , असे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा . प्रसाद देसाई यांनी सांगितले . असे आहे

  वेळापत्रक : २० ते २४ ऑगस्ट :
  प्रवेश अर्ज विद्याथ्यांना वितरित करणेव जमा करणे . २७ ऑगस्ट : अजांची छाननी , संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे . २७ ते ३१ ऑगस्ट : पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे .१ ते २ सप्टेंबर : रिक्त जागी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे . २ सप्टेंबर : दुपारी ४ वाजता तिसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर . 3 सप्टेंबरलाःरिक्त जागी चौथ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश देणे व यादी जाहीर करणे . ४ सप्टेंबर : रिक्त जागी चौथ्या यादीतील प्रवेश देणे , प्रतीक्षा यादीतील प्रवेश पूर्ण होऊनही शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांना अर्जानुसार गुणानुक्रमे भरणे . ७ सप्टेंबर : शिक्षण उपसंचालक , शिक्षणाधिकारी यांच्याकडे आलेल्या अर्जाची यादी , संवर्गनिहाय यादी , प्रवेश दिलेल्या दिनांकासह सादर करणे . १४ सप्टेंबर : प्रवेशप्रक्रिया झाल्यानंतरही शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देणे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.