वाकोद , ता . जामनेर : गेल्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोसळधार पावसाने न्हावून निघाली असून डोंगरमय लेण्याच्या दऱ्याखोऱ्यातून संततधार वाहत आहे तर सप्तकुंड धबधबा खळाळून वाहत असून निसर्गाचे सौंदर्य मोहित करीत आहे . सप्तकुंड भरून धबधबा वाहत आहे . ऐतिहासिक वास्तू असलेल्या अजिंठा लेणीचे या वाहत्या धबधब्याने व उंच उंच डोंगर रागांनी हिरवळीची चादर पांघरलेली असल्याने हे देखणे निसर्ग सौंदर्य रूप पर्यटकांना मोहून घेत आहे.गेल्या महिना दिड महिनाभरात दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसापासून रौद्र रूप धारण केलेले दिसून येत आहे . वाकोदसह परिसरात दमदार पावसाने नदी , नाल्याना पूर आला असून त्यामुळे आता पाण्याचे अनेक स्त्रोत खळखळून वाहत आहेत .
Home » अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधब्याने धारण केले रौद्र रूप.