• Tue. Aug 16th, 2022

  अज्ञात तरुणांनी केला डॉक्टरचा खून ; एसपी म्हणाले मारेकरी नरकात असला तरी शोधणार , सापडला नाही तर नोकरी सोडणार.

  ByKhandeshTimes

  Sep 7, 2021

  धुळे : तालुक्यातील दराणे येथील गुरांच्या डॉक्टरचा चिमठाणे गावाजवळ खून झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली प्रेमसिंग राजेंद्र गिरासे असे मृताचे नाव आहे . या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली .

  * एसपी म्हणाले या घटनेचे मारेकरी सापडले नाही तर नोकरी सोडून देईन

  त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आंदोलकांची समजूत काढली . या घटनेचे मलाही दुःख आहे . रस्त्यावर कुणीही गुन्हा करत असेल तर त्याला जरब दाखवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे .या घटनेतील मारेकरी नरकात जरी असेल तरी त्याला शोधून काढेल . तो सापडला नाही तर नोकरी सोडून देईन , असे आश्वासन पोलिस अधीक्षक पंडित त्यांनी या वेळी दिले . याप्रकरणी साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले . दराणे येथील प्रेमसिंग गिरासे हे व्हेटर्नरी डॉक्टर होते . शिंदखेडा येथील गुरांच्या दवाखान्यात ते सराव करत होते . दराणे येथून ये – जा करण्यासाठी सोमवारी त्यांनी शिंदखेडा येथून नवी दुचाकी घेतली होती .

  * अज्ञात तीन तरुणांनी त्यांना अडवले

  त्यानंतर ते दुपारी दोनला घरी जात असताना चिमठाणे गावाजवळील रेस्ट हाऊस जवळ अज्ञात तीन तरुणांनी त्यांना अडवले . त्यांच्या जवळून मोबाइल आणि दुचाकी हिसकावण्याच्या प्रयत्न केला प्रेमसिंग याने विरोध करताच एकाने चाकूने सपासप वार केले . त्यानंतर ते पळून गेले . प्रेमसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडले . गावात ही घटना कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली . प्रेमसिंग गिरासे यांना धुळे येथे घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्याचे निधन झाले

  रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची

  नोंद करण्याचे काम सुरू होते .

  * प्रेमसिंग कुटुंबातील एकुलता होता

  प्रेमसिंग हा आपल्या कुटुंबातील एकुलता होता . त्यांना एक लहान बहीण आहे . आई – वडील शेती करतात . वडिलांच्या पायाचे उद्या मंगळवारी ऑपरेशन होते . पोळा सणावर विरजण प्रेमसिंग यांच्या खुनाची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबावर आणि गावावर एकच शोककळा पसरली . कोणीही पोळा सण साजरा केला नाही . घटना कळताच आई आणि बहीण बेशुद्ध झाली . दरम्यान गावातील लोकांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.

  Leave a Reply

  Your email address will not be published.