• Tue. Aug 16th, 2022

  अबब !आता आपल्या घामानं चार्ज करा स्मार्ट वॉच.

  ByKhandeshTimes

  Aug 24, 2021

  आजच्या काळात वाढत असलेल्या तंत्रण्यामुळे स्मार्ट जाँच चार्ज करण्याचे तुमचे टेन्शन दूर होण्याची शक्यता आहे . आता शरीरातून येणाऱ्या घामाच्या मदतीन स्मार्ट वॉच चार्जिंग करता येणार आहे . सध्याच्या जीवनशैलीत स्मार्ट वॉच म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय . काही जण तर 24 तास हातात स्मार्ट वॉच घालून असतात . या स्मार्ट वॉचमुळ तुम्ही किती पावलं चाललात , तुमच्या हृदयाचे ठोके किती पडतायत , तुमची रक्तातील ऑक्सीजनची पातळी किती आहे . या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात .
  * 24 तास हातात स्मार्ट वॉच मग ते चार्ज कधी करणार ? एखाद्या दिवशी आपण स्मार्ट वॉच चार्ज केलं नाही तर केवढ टेंशन येत . मात्र , आता तुमच हे टेंशन दूर होण्याची शक्यता आहे . याच कारण आहे संशोधकांनी लावलेला नवा शोध , आणि हा शोध आहे शरीरातून येणाऱ्या घामाध्या मदतीनं स्मार्ट वॉच चार्जिंग .
  * हे वाचून तुम्ही म्हणाल काहीही काय ? घामानं स्मार्ट वॉच कसं चार्ज होईल , तर होईल . नक्की होईल .
  याचं कारण संशोधकांनी स्मार्ट वॉचसाठी एक खास बॅटरी तयार केली आहे जी इलेक्ट्रिसिटीच्या ऐवजी घामाने चार्ज होईल . ही एक पोर्टेबल बॅटरी असून स्पेशल वायरलेस डिवाइससाठी तयार करण्यात आलेली आहे . ही बॅटरी फक्त दोन मिलीलीटर घामानं 20 तासांपर्यंत स्मार्ट वॉच चार्ज करू शकणार आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.