• Tue. Aug 16th, 2022

    अबब! चक्क दोन दिवसात १०० मिमी पावसाची नोंदः ठिकठिकाणी गटारी ओव्हर फ्लो.

    जळगाव : पावसाचा वेग दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी शहरात रात्री ७ पासून सुरू झालेल्या पावसाने सुमारे २ अडीच तास अक्षरश : थैमान घातले अवघ्या २ तासात शहरात एकूण ६६ मिमी पावसाची नोंद झाली असून , या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद बुधवारी रात्री झाली आहे .पावसाचा वेग इतका प्रचंड होता की , अवघ्या अर्ध्या तासातच शहरातील गटारी ओव्हर फ्लो होऊन रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते .

    त्यामुळे दोन दिवसात १०० मिमी पावसासह बुधवारी रात्री अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली . गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुन्हा कमबॅक झाले असून , दोन दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर आता जळगाव शहर परिसरातदेखील जोरदार पाऊस झाला . बुधवारी सायंकाळी ५ वाजेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती . ५ वाजता पाऊस झाल्यानंतर पावसाने एक – दीड तास विश्रांती घेतली . मात्र , त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली .

    Leave a Reply

    Your email address will not be published.