अभाविपच्या मागणीला यश … उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून थेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.

शेअर करा.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागून बरेच दिवस लोटले गेले परंतु , त्यांना गुणपत्रकाची हार्ड कॉपी विद्यापीठाकडून अद्यापही देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एडमिशन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या येत होत्या . त्यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , जळगाव तर्फे परीक्षा नियंत्रक प्रा . पवार सर यांना निवेदन देण्यात आले होते .

यावेळी त्यांनी पाच दिवसात गुणपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात येतील असे सांगितले होते . आणि आता थेट उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून अभाविपच्या मागणीला यश आले आहे. विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केल्यामुळे आता ज्या विदयार्थ्यांना एडमिशन घेण्यात समस्या होत होत्या त्यांच्या या समस्या आता दूर होणार आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply