‘अभ्यास झाला नाही सर पेपर पुढे ढकला ‘विद्यार्थीची मागणी.

शेअर करा.

नागपूर : विभागीय शिक्षण मंडळाकडून दरवर्षी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता हेल्पलाईन आणि समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येते असे, विद्यार्थी त्यावर परीक्षेसंदर्भात विचारणा करतात असतात . मात्र यंदा या हेल्पलाईन आणि समुपदेशकांच्या मोबाईलवर येणारे विद्यार्थ्यांचे कॉल ‘ सर , अभ्यास झाला नाही परीक्षा या पुढे ढकला ना … अशी विनंती करणारेच येत आहेत .

अनेक कॉल हे बाराव्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आहेत . राज्य शिक्षण मंडळाच्या ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्धार केला आहे . पण दुसरीकडे विद्यार्थ्यांची ओरड परीक्षा पुढे ढकलण्याकरीता होत आहे. विशेष म्हणजे या मागणीकरीता ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांचे जास्त कॉल येत आहेत.

 

२०२१-२२ या शैक्षणिक सत्रात कोरोनाचा अभ्यासाला जोरदार फटका बसला ऑनलाईन शिक्षण सुरू होते परंतु ते फारसे परिणामकारक ठरले नाही ग्रामीण आणि दुर्गम भागात तर ऑनलाईन शिक्षण शक्य झालेच नव्हते . फेब्रुवारीपासून शाळा या सुरू झाल्या . पण अजून देखील विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती नगण्य स्वरुपाची आहे . ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी यावर्षी परीक्षा होणार नाही आणि मागच्या वर्षीप्रमाणे आपणही पास होऊ १ याच मानसिकतेमध्ये आहेत . आता परीक्षा या तोंडावर आल्या आहेत .

विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय कोणताही पर्याय नाही . अभ्यासाला वेळ कमी असल्याने विद्यार्थी बोर्डाच्या हेल्पलाईनवर अभ्यास झाला नाही असे प्रश्न करित आहेत , परीक्षा पुढे ढकला अशी विनवणी करीत आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply