• Tue. Aug 16th, 2022

  अमळनेर ची घटना कुत्र्याला गेला वाचवायला परंतु वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा उलटली ! मग काय झाले.

  ByKhandeshTimes

  Sep 12, 2021

  अमळनेर : चोपडा -अमळनेर रस्त्यावरील शिंदेनगरजवळ सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास रस्त्यात कुत्रा आडवा आला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा उलटली यामुळे पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे . जखमींना न्यु प्लॉट भागातील तरुणांनी पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले मात्र आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता . यामुळे ग्रामस्थानी रोष व्यक्त केला , चोपडा अमळनेर रस्त्याने चोपड्याकडून प्याजो रिक्षा आठ जणांना घेऊन धुळ्याकडे जात होती . याचवेळी रस्त्यात कुत्रा आडवा आला . यावेळी पावसामुळे रास्ताही ओला होता . चालकाने अचानक ब्रेक लावल्याने चालती रिक्षा उलटली आणि आठही प्रवासी रस्त्यावर पडले यावेळी समोरच न्यु प्लॉट भागातील काही तरुण बसले होते . त्यांनी घटनास्थळ गाठत मदत केली . गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अविनाश मोरे , रामदास भिल , कलाबाई भिल , अलका मोरे , सुदाम मोरे यांचा समावेश आहे प्लॉट भागातील तरुण सर्व जखमींना पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले . मात्र येथे डॉक्टरसह कुणीच कर्मचारी नसल्याने गावातील लोकांचा रोष वाढला व संताप व्यक्त केला . बघता बघता यावेळी बहुसंख्य लोक जमा झाले . उपस्थित काही लोकांनी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना फोन ही लावले . तरीही एकही हजर झाले नाही.जखमींना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने शेवटी अंबुलन्स ने पुढील उपचारासाठी धुळे हलविण्यात आले . या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गलथान कारभारामुळे नागरिकांनमध्ये रोष दिसून आला आहे

  Leave a Reply

  Your email address will not be published.