अमळनेर येथील घटना : विवाहित महिलेने घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या !

शेअर करा.

जळगाव : अमळनेर शहरातील ढेकूरोडवरील एका तरुण विवाहित महिलेने घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १२ रोजी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास आनंद कॉलनीत घडली .

* पती मंदिरात ड्युटीला गेले असता सोनियाने घेतला घरात गळफास :

सोनिया घन : श्याम काटे असे त्या महिलेचे पूर्ण नाव असून सोनिया यांचे पती घन : श्याम मुरलीधर काटे हे मंगळग्रह मंदिरात रात्र पाळीला ड्युटीला गेले असता सोनियाने घरात गळफास घेतला .

* पतीने सांगितले पत्नी होती मानसिक रूग्ण :

माझी पत्नी ही मानसिक रुग्ण होती . धुळे येथील डॉ . गौतम शहा यांच्याकडे तिचे उपचार सुरू होते , अशी माहिती पती घन : श्याम यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला दिली .

त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस करणार आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply