अरे बापरे ! सोशल मीडियावर त्यांनी केला भुताचा व्हिडीओ व्हायरल , मग काय झाले?

पहूर , ता.जामनेर : तोरनाळा गावाजवळील पठारतांडा फाट्यावर एक कथित भुतांचा व्हिडीओ सोशल मीडियावर काही तरुणांनी व्हायरल करण्यात केला होता . त्यामुळे पहूर पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे .

* व्हिडीओ मध्ये शिर नसलेला मुलगा आणि महिला रस्त्यावर उलटया पावली होती चालत ?

यासंदर्भात अधिक असे की , तोरनाळाजवळील पठारतांडा येथे शिर नसलेला मुलगा आणि महिला रस्त्यावर उलटया पावली चालत असल्याचा व्हीडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता . याप्रकरणी जमील शहाँ , गोपाल तंवर व सतिश शिंदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे .

 * व्हिडीओ बनविण्याचा नेमका उद्देश काय याचा पोलीस घेत आहे शोध ?

पोलीस या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत आहे . तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचाही अभ्यास या प्रकरणात सुरु आहे . व्हिडीओ बनविण्याचा उद्देश काय याचा पोलीस शोध घेत आहे . आणि त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.