अवघ्या दोन मिनिटांत दुचाकीच्या डिकीतून लांबविले ८० हजार रुपये.

शेअर करा.

भुसावळ : अवघ्या दोन मिनिटांत शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ ४० ते ५० मीटर अंतरावर असलेल्या जळगाव जनता बँकेलगत लावलेल्या दुचाकीच्या डिकीत ठेवलेले ८० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. . केवळ दोन मिनिटांतच चोरट्यांनी ही रक्कम दुचाकीच्या डिकितून लांबविली . शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबत माहिती अशी की , शांताराम विठ्ठल मानकरे ( रा तुकाराम नगर भुसावळ ) हे दुचाकीवरून पत्नी कुमुदिनी मानकरे यांच्या सोबत शुक्रवारी दुपारी जेडीसीसी बँकेत आले आले होते . प्लॉट खरेदीसाठी रक्कम लागत असल्याने या दाम्पत्याने खात्यातून ८० हजारांची रोकड काढली वही रोकड कागदपत्रे असलेल्या एका बॅगेत ठेवली व ही बॅग जळगाव जनता बँकेच्या बाहेर लावलेल्या त्यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवली . जळगाव जनता बँकेत त्यांचे खाते असल्यामुळे पॅन कार्ड खात्याशी लिंक करण्यासाठी दाम्पत्य बँकेत शिरताच चोरट्यांनी दुचाकीच्या डिकीतून कागदपत्रे व रोकड असलेली बॅग लांबवली . याबाबत मानकरे यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच बँकेच्या परिसरातील असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे . लांबविलेल्या बॅगेत धनादेश , पासबुकसह ८० हजारांची रोकड होती .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply