• Tue. Aug 16th, 2022

  अहमदनगरात देव मूर्तीचे दागिने गेले चोरीला

  अहमदनगर : शहरामध्ये चोरी , घरफोड्यांचे सत्र चालू असताना चोरटे मंदिरामधिल दानपेटी अन् देवाच्या मूर्तीवरील दागिन्यांची देखील बिनधास्त चोरी करू लागले आहेत .

  शहरातील नेप्ती नाका येथील श्री संत बाळाजीबुवा विठ्ठल मंदिरात चोरट्यांनी चोरी केली असल्याचे कळाले आहे . मंदिरातील दक्षिणा पेटी तसेच विठ्ठल मूर्तीच्या गळ्यामधील सोन्याचा बदाम व रुक्मिणीमाता मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र देखील चोरट्यांनी चोरून नेले . २२ डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडलेली आहे .

  याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला मंदिराचे पुजारी चंद्रकांत एकनाथ भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादी खालील प्रमाणे अज्ञात चोरट्यांवि रोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . चोरट्यांनी एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणा बाबत हेड कॉन्स्टेबल वाघमारे हे पुढील तपास करत आहेत . मागील काही दिवसांत नगर शहरात चोरी , घरफोडी , वाहन चोरी , रस्ता लूट आदी घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.