एका आईने एकाच वेळी सात बाळांना जन्म दिल्याची माहिती समोर आली असून अनेकांसाठी हे आश्चर्यकारक अशी बातमी ठरली आहे. ही बातमी सोशल मीडियावर आगी प्रमाणे पसरली आहे . या आईने एकाच वेळी सात बाळांना जन्म देण्याची आश्चर्यकारक अशी घटना पहिलीच असावा यामुळे कुतूहलही देखील वाटत आहे . सात बाळांना जन्म देण्याची ही बातमी अबोटाबाद मधील असून याबद्दल त्या ठिकाणच्या आरोग्य विभागाने ट्विट करून माहिती पुरवलेली आहे .
खैबर पख्तूनख्वा याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे अबोटाबाद येथील एका आईने एका खासगी रुग्णालयामध्ये सेप्टअपलेटला जन्म दिला. याबद्दल आरोग्य विभागाने ट्विट करून सांगितले आहे की , एका आईने अबोटाबादमध्ये सात बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे . सातवे बाळ हे नवजात अतिदक्षता विभागात ( NICU ) मध्ये उपचारासाठी दाखल आहेत .
तर आईला रुग्णालयामध्ये दाखल केले जाते आणि सेहत कार्ड प्लस प्रोग्राम याद्वारे उपचार केले जाते . आणि इतरत्र , खैबर पख्तूनख्वाचे आरोग्य मंत्री तैमूर खान झगरा यांनीही त्या मुलांचा एक फोटो ट्वीट केल्याचे कळाले आहे .