आजादी का अमृत महोत्सव जागर यात्रेचे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने जिल्ह्याभरात स्वागत’.

शेअर करा.

*जळगाव* – स्वातंत्र्याच्या ७५ व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या निमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, अंतर्गत गित व नाटक विभाग व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो, जळगाव यांच्या वतीने व भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या सहकार्यातून

जळगाव जिल्ह्यात दि.२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान ही जागर यात्रा फिरली,

या जागर यात्रेचे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने ठिक – ठिकाणी स्वागत करून गाव पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले,

याच पार्श्वभूमीवर *लाडली (ता.धरणगाव)* गावात या जागर यात्रेच्या माध्यमातून समारोपीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला,

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरूवात झाली,

यात भारत सरकारच्या गित व नाटक विभागाची मान्यता प्राप्त कलासंस्था दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे पथनाट्य प्रमुख विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, अवधूत दलाल, अरविंद पाटील, मोहीत पाटील, आकाश धनगर, विलास पाटील यांच्या कलापथकाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर करण्यात आला तसेच देश भक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला,

या कार्यक्रमास गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला,

युवा परिषदेचे जिल्हा सचिव आकाश गोरख पाटील यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला,

यावेळी व्यासपीठावर लाडलीचे उपसरपंच गजानन प्रताप पाटील, पोलीस पाटील जगन्नाथ काळू पाटील, रविंद्र गोपीचंद पाटील, सुनिल पांडुरंग पाटील, भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, उपाध्यक्ष अविनाश जावळे, महासचिव सागर महाजन, सचिव आकाश गोरख पाटील, आकाश धनगर, समन्वयक इरफान पिंजारी, राहूल पाटील, भावेश रोहीमारे आदी उपस्थित होते,

कार्यक्रम यशस्वितेसाठी रत्नदीप गुजर, मधुसूदन गोपाल पाटील , सागर पाटील यांच्यासह युवा परीषदेचे धरणगाव तालुका उपाध्यक्ष निलेश पवार, जळगाव तालुका सचिव विलास पाटील, सौरभ जैन यांनी परिश्रम घेतले,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक राहूल पाटील यांनी केले तर जिल्हा सचिव आकाश पाटील यांनी आभार मानले.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply