आता पुण्यामध्ये देखील मिळणार Google ला जॉब, वाचा सविस्तर बातमी.

शेअर करा.

पुणे : सर्वात मोठी व प्रसिद्ध कंपनी म्हणून प्रख्यात असलेले Google याकडे पाहिले जाते . आता गूगलकडून भारतात आपल्या कंपनीची ( Google India Jobs ) व्याप्ती वाढविण्याकरिता व जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे . यामुळे गुगल आता लवकरच पुण्यामध्ये आपलं ऑफिस सूरू करणार असल्याचे कळाले आहे . याबाबत सोमवारी गुगलने जाहीर केलं आहे .

 

गुगलच्या माहिती प्रमाण , जे प्रगत एंटरप्राइझ Cloud तंत्रज्ञान तयार करण्याकरिता व्यावसायिकांना नियुक्त करेल .या वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे , ही सुविधा Cloud production इंजिनिअरिंग , टेक्निकल असिस्टंस व जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करेल . म्हणून ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा याबाबत शिक्षण घेतलं आहे त्यांना या नवीन ऑफिसमध्ये जॉब मिळण्याची दाट शक्यता आहे .

 

यादरम्यान , या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत गुगलने पुण्यामध्ये देखील आपलं क्लाउडबाबत ऑफिस सुरु करणार आहे . यामुळे राज्यातील व देशभरातील अनेक तरुण – तरुणींना , फ्रेशर्स तसेच प्रोफेशनल्ससाठी नोकरीची दारे खुली असणार आहेत . भारतात मधील क्लाउड इंजिनीअरिंगचे VP अनिल भन्साळी ( Anil Bhansali ) म्हणाले , ” पुण्यात कार्यालय झाल्यानंतर फ्रेशर्स व प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे .

 

एक IT हब म्हणून , पुण्यामधील आमचा विस्तार आम्हाला उच्च प्रतिभेचा वापर करण्यास सक्षम करणार कारण आम्ही आमच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्राहकांसाठी प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स , उत्पादने व सेवा विकसित करत आहोत . ” त्याच बरोबर , ” ग्राहक त्यांचे विश्वासू भागीदार म्हणून Google क्लाउडकडे वळतील असे उत्पादन तयार करण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत ” असं देखील त्यांनी म्हटलं आहे . गतवर्षी नोव्हेंबरमध्ये , कंपनी IBM चे वरिष्ठ कार्यकारी सुब्रम नटराजन यांची भारतातील कामकाजासाठी ग्राहक अभियांत्रिकी संचालक म्हणून नियुक्ती केली .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply