आता फिटनेस असेल तरच वाहने वापरा अन्यथा भंगारात देऊन टाका !

नंदुरबार : जुन्या वाहनांना भंगारात काढण्याची पॉलिसी येत्या काही दिवसात अंमलात येणार आहे . या नवीन पॉलिसीनुसार दरवर्षी जुन्या वाहनांचे फिटनेस तपासणी करुनच ते रस्त्यावर आणावे लागणार आहे वाहनधारकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेतल्यास त्यांच्यावर कारवाईही होणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे . नंदुरबार जिल्ह्यात १५ वर्ष जुन्या चारचाकी वाहनांची संख्या ही कमी असली तरी १५ वर्ष जुन्या दुचाकींची संख्या ही मोठी आहे . २००२ पासून जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु झाल्यापासून नोंदणी केलेल्या वाहनांना १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून ग्रीन टॅक्स वसूली करण्यात येत आहे . यापूर्वी दर पाच वर्षांनी होणारे फिटनेस प्रमाणपत्र आता वर्षान करावे लागणार आहे.ज्या वाहनांना १५ वर्ष पूर्ण होतील त्यांना हे प्रमाणपत्र आरटीओ कडून घ्यावे लागणार आहे . यासाठी नागरीकांच्या आरटीओच्या चकरा मात्र वाढणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.