आता शाळा सोडल्याचा दाखला मिळेल एका क्लिकवर, शंभर वर्षांपूर्वीचा असेल तरीदेखील मिळेल दाखला वाचा सविस्तर बातमी

शेअर करा.

कोपरगाव ( नगर ) : तालुक्यातील संवत्सर या ठिकाणच्या नऊ जिल्हा परिषद शाळांनी १ ९ १३ पासून २०२१ पर्यंत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले अजून देखील जतन केले असून , ही संख्या १५ हजार १७४ इतकी आहे .

यामध्ये कोणताही दाखला एका क्लिकवर अवघ्या पाच मिनिटांमध्ये काढून मिळू शकतो . त्यामुळे संवत्सर येथील जिल्हा परिषद ही शाळा राज्यासाठी रोल मॉडेल ठरलेली आहे . मुख्यता म्हणजे हा उपक्रम लोकसहभागतून राबविण्यात आलेला आहे . याकरिता जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी प्रयत्न केले असल्याचे कळाले आहे .

यासाठी संवत्सर शाळेचे मुख्याध्यापक फैयाजखान पठाणा यान बरोबर इतर आठ शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक व पालकांचे विशेष योगदान लाभलेले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply