आता Mobile वर बोलल्यास कारचालकाला दोन हजार दंड.

मुंबई : नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून , अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे . त्यामुळे वाहतूक नियम उल्लंघना चाप बसणार आहे . परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ ला अधिसचना जाहीर केली आहे .

असे आहेत नवीन नियम :

1.बेदरकारपणे आणि धोकादायकरीत्या वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये , तर चारचाकी चालकाला तीन हजार रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्यात येईल . यापूर्वी दंडाची ही रक्कम ५०० रुपये होती .
2.तीन वर्षात दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे .
3.मोबाइलवर बोलताना वाहन चालविल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये , चारचाकी वाहनचालकाला दोन हजार रुपये आणि अन्य वाहनचालकाला चार हजार रुपये दंड होणार आहे .
4.वाहनांना परावर्तक ( रिफ्लेक्टर ) नसणे , फॅन्सी नंबर प्लेट बसविणे या वाहतूक नियमांविरोधात यापूर्वी २०० रुपये असलेल्या दंडाच्या रकमेत वाढ करून ती एक हजार रुपये करण्यात आली आहे .
5.परवाना ( अनुज्ञप्ती ) नसतानाही वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.