आता MPSC परीक्षेसाठी नंदुरबारात नऊ केंद्रांची निर्मिती.

नंदुरबार : राज्य लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- बसंयुक्त परीक्षा ४ सप्टेंबर रोजी होणार आहे . या परीक्षेसाठी ३ हजार ६४३ परीक्षार्थी ही परीक्षा देण्यास पात्र आहे . त्यामुळे नंदुरबार शहरात ९ परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे . शहरातील श्रॉफ हायस्कूल जीटीपी महाविद्यालय , डी.आर. हायस्कूल , कमला नेहरु विद्यालय , एकलव्य विद्यालय , एस . ए . मिशन हायस्कूल , पी.के. पाटील विद्यालय , डॉ.काणे हायस्कूल या केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे . परिक्षेसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून १५२ वर्गखोल्याची व्यवस्था करण्यात आली आहे . राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे तसेच तहसीलदार उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र प्रमुख , पर्यवेक्षक , समवेक्षक अधिकारी , कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण पहिले प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते . दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन ३ सप्टेंबर रोजी परीक्षा केंद्रावर होणार आहे , असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.