आधी चोरायचे दुचाकी नंतर मोबाइल लांबवायचे.

शेअर करा.

जळगाव : गेल्या दोन महिन्यात पांडे चौक , रिंगरोड परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत होत्या . या प्रकरणात एका अट्टल दुचाकी चोरट्याचे नाव समोर आल्यानंतर एलसीबीच्या पथकाने शनिपेठेतून दोघांना अटक केली . तर एक अट्टल दुचाकी चोरटा बेपत्ता झाला आहे अक्षय उर्फ मॉडेल उर्फ टकोरा मुकेश अटवाल व अक्षय आनंदा जावळे ( रा . शनिपेठ ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत . तर रोहित पंडित निदाने हा त्यांचा साथीदार बेपत्ता झाला आहे
* असा होता चोरीचा पॅटर्न :
हे चोर आधी दुचाकी चोरायची नंतर तिचा वापर करून पादचाऱ्यांच्या हातून मोबाइल लांबवायचे . निदाने याने मलकापूर परिसरात गेल्या सहा महिन्यांत १७ दुचाकी चोरल्या होत्या . हे तिघे जण याच चोरीच्या दुचाकी जळगाव शहरात वापरत होते . याच दुचाकींच्या मदतीने पादचाऱ्यांचे मोबाइल लांबवत होते . या घटना वाढल्यानंतर एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहिती काढली . त्यावरून रोहित निदाने याचे नाव समोर आले होते . तर अक्षय अटवाल व अक्षय जावळे यांनी हे गुन्हे केल्याची माहिती मिळाली . त्यानुसार पोलिस पथकाने दोन्ही अक्षयला घरातून ताब्यात घेतले . त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली . तसेच पादचाऱ्यांकडून लांबवलेले दोन मोबाइलही त्यांनी पोलिसांना काढून दिले आहेत . पांडे चौक व रिंगरोड परिसरातून मोबाइल लांबवल्याचे त्यांनी सांगितले . दोघांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे . तर रोहित निदाने याचा शोध सुरू आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply