जळगाव : काही दिवसापूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यातील अटक केलेला तरुण नागरिकांच्या मारहाणीत जखमी झाला त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मृत शेख अयाज व रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या तरुणास पाहण्यासाठी आजोबांनी जखमी नातवाची अवस्था पाहताच जागेवरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला . रविवारी सकाळी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक नऊमध्ये ही घटना घडली . शेख अयाज अब्दुल रजाक ( वय ५२ , रा.पाळधी ) असे मृताचे नाव आहे . तर मुजाहीद आलेल्या चुलत अली मुजफ्फर अली असे जखमी नातवाचे नाव आहे .
* परिवाराचा आरोप : पोलिसांनी गुप्तांगावर मारहाण करून शरीरात इंजेक्शनने पेट्रोल सोडले
पीडितेच्या परिवाराने पोलिसांवर आरोप लावीत सांगीतले की पोलिसांनी तरुणास जबर मारहाण करून तसेच गुप्तांगावर मारहाण करून इंजेक्शनने शरीरात पेट्रोल सोडल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली ; परंतु संबंधित तरुणावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे . त्याला नागरिकांनी मारहाण करून ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .