आयटीआय चालणार प्रवेशप्रोत्साहन अभियान कारण अर्जाच्या संख्या होताहेत कमी ;

शेअर करा.

जळगाव : खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांकडून यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे . यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे . याशिवाय , आता संस्थांमधील प्रवेश शंभर टक्क्यावर होतील यादृष्टीने खासगी व शासकीय आयटीआय ” प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविणार आहे . आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया ही १ ऑगस्टपासून सुरू आहे . जळगाव जिल्ह्यात पूर्ण ३० शासकीय व खासगी आयटीआय आहेत . या आयटीआयमधील जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशाची प्रक्रिया करण्यात येत आहे . मागच्या वर्षी १६ हजार ५१३
विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज कन्फर्म केले होते . परंतु , या वर्षी १० हजार ३७ ९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून , त्यापैकी १० हजार ७५ विद्यार्थ्यांनी अर्जाची पुष्टी केली आहे . मागच्या वर्षीच्या मानाने राज्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी अर्जाचा मात्रा घटलेली असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे . यामुळे संस्थांमधील प्रवेश शंभर टक्के होतील , या विचाराने ‘ प्रवेश प्रोत्साहन अभियान ‘ राबविण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे .

अभियानात होणार याचा समावेश …
आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना संम्पुर्ण माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान चालविण्यात येत आहे . या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र घेण्याची सूचना केल्या आहेत,मागासलेल्या व ग्रामीण भागात प्रवेशाबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे . प्रसार माध्यमांच्या वापरातून विद्यार्थ्यांना प्रवेशाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे . तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत , त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेषतः प्रयल करण्यात येणार आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply