आरक्षणावरून टोलवाटोलवी बंद करा : खा . संभाजीराजे

नांदेड । मराठा समाजाचे आरक्षण देण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी आहे . हे चेंडू – चेंडू खेळण्याचे राजकारण बंद करा , राज्य आणि केंद्र सरकारने आपापली जबाबदारी पार पडून मराठा समाजाला आरक्षण द्यावे . आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका , असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारकडे दिला . मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संपुर्ण मराठा समाजाच्या पहिल्या मूकमोर्चाची सुरुवात शुक्रवारी नांदेडमधून करण्यात आली . या वेळी खा . संभाजीराजे बोलत होते .

भाजपचा डॅमेज कंट्रोलचा हा प्रयल : चव्हाण

आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेवरून संसदेत भाजपची उघड पडली . मराठा समाजाला नेमकी वस्तुस्थिती काय ते लक्षात आली आहे . त्यामुळे खा . संभाजीराजे यांच्या आडून भाजप ‘ डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न करत असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयाचे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत केली .

Leave a Reply

Your email address will not be published.