• Tue. Aug 16th, 2022

  आरोग्य उपकेंद्रात परिचारिका नसल्याने महिलेची झाली प्रवेशद्वारातच प्रसुती.

  ByKhandeshTimes

  Aug 25, 2021

  प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा भोंगळ कारभार आता समोर आला आहे झाले असे की त-हाडी येथील एका महिलेला प्रसुतीकळा होत असल्याने तिला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आणले.मात्र नेहमीप्रमाणे येथे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने , त्या महिलेची उप केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसुती झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला . प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे . मात्र त -हाडी आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी राहत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे . या उपकेंद्रात एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह एक परिचारिका व एक आरोग्य सेवक कार्यरत आहे .

  रविवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास त – हाडी येथील सपना दशस्थ पारधी या महिलेला प्रसुतीकळा होऊ लागल्या . या महिलेची सासू लताबाई पारधी व सरलाबाई पारधी यांनी तत्काळत्या महिलेला आरोग्य उपकेंद्रात हलविले . मात्र इथपर्यंत तिला असह्य वेदना होत होत्या . लताबाई , सरलाबाई यांनी आरोग्य उपकेंदाच्या प्रवेशद्वारापासूनच डॉक्टर परिचारिका यांना आवाज दिला . मात्र कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही . अखेर सपनाबाईची उपकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच प्रसुती दिली . तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला . बाळ व बाळंतीणची प्रकृती ठीक आहे . दरम्यान आरोग्य उपकेंद्रात घडलेल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांमध नाराजी व्यक्त होत आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.