इंटरनेटचा स्पीड ला येणार गती 5G चा वापर होणार लवकरात लवकर सुरू

शेअर करा.

नवी दिल्ली : येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला ४ जीच्या तुलनेमध्ये दहापट वेगवान असलेले इंटरनेट वापरता येणार आहेत . पुढील येत्या महिन्यात ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे ही पूर्ण प्रक्रिया वेळेत पार पडली तर सर्वांना ५ जी सेवेचा आनंद उठवता येणार आहे .

सरकारने दिलेल्या आदेशानुसार स्पेक्ट्रम खरेदी करण्याकरिता कोणत्याही कंपनीला ६ महिने ते १ वर्षाच्या आत सेवा ही सुरू करावी लागेल . अनेक टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांची तयारी पूर्ण केलेली आहे , यामुळे ते spectrum खरेदी केल्यानंतर ३ ते ६ महिन्यांत सेवा सुरू करू शकतात .

संपूर्ण जगात अनेक देश हे ५ जी नेटवर्क वापरत आहेत . स्पीडटेस्ट इंटेलिजन्सप्रमाण दक्षिण कोरिया सध्या जगातील सर्वांत वेगवान ५ जी सेवा वापरत आहेत . त्यांचा वेग ४६२.४८ एमबीपीएस आहे . ४२६.७५ एमबीपीएस स्पीडसह नॉर्वे द्वितीय स्थानावर आहे दुसरीकडे , संयुक्त अरब अमिराती ४० ९.९ ६ एमबीपीएस स्पीडसह तिसऱ्या क्रमांकावर आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply