ई -पीक पाहणीसाठी जिल्हाधिकारी थेट पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर.

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक गावात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पीक पाहणी साठी शेतकऱ्याच्या बांधावर पोहुचन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला …वाचा सविस्तर
* पंचनामे झाले असुन लवकरात लवकर मदत पोहचवू :
महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी ई पीक पाहणी कार्यक्रम राबवीत आहे याद्वारे शेतकऱ्याच्या शेतातील पीक क्षेत्रातील पीक तेच उताऱ्यावर अपेक्षित आहे तर गेल्या तीन आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले असुन लवकारत लवकर पोहचविण्यासाठी नियोजन करणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले .

* महसूल विभाग करीत आहे चांगली कामगिरी :
यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी अधिकारी राऊत म्हणाले की ई पीक पाहणी कार्यक्रम असं अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम महसूल विभाग राबवीत आहे गेल्या अनेक दिवसांपासून महसूल विभाग चांगली कामगिरी करीत आहे .
* ई पीक नोंदणीसाठी तीस तारखेपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे
जिल्ह्यातील आठ लाखाहून जास्त खातेदारांनी नोंदणी झाली आहे राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहेत ई पीक नोंदणीसाठी तीस तारखेपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे
* जिल्हाधिकारी : शेतकऱ्यांसाठी हे अडचणीचे प्रसंग असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी :
शेतकऱ्यांना या वेळी जिल्हाधिकारी यांनी आव्हान केले की शेतकऱ्यांसाठी हे अडचणीचे प्रसंग असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी व मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत ती मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचे नियोजन करू असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published.