जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ(KBCNMU) परिसरामध्ये नुकतीच कृष्ण गरुड (ब्लॅक ईगल) या एका दुर्मिळ पक्ष्यांची नोंद करण्यात आलेली आहे विद्यापीठ परिसर हा जैवविविधतेने नटलेला परिसर असून , आता कृष्ण गरुड यासारख्या दुर्मीळ पक्ष्याची भर पडली असल्याचे दिसून येत आहे . विद्यापीठामधिल कर्मचारी अरुण सपकाळे हे पक्षीनिरीक्षण करत असताना त्यांना हा पक्षी आढळला त्यांनी त्याचा फोटो काढून वन्यजीव संरक्षण पक्षी अभ्यासकांना खात्री करुण घेण्यासाठी पाठविल्यानंतर हा पक्षी कृष्ण गरुड असल्याचे खात्री झाली .
विद्यापीठाचा संपूर्ण परिसर मूलतः जैवविविधतेने समृद्ध आहे . पक्ष्यांच्या बाबतीत देखील या ठिकाणी विविधता असून , पक्षीमित्रांच्या अनुसार विद्यापीठाच्या आवारात पानपक्षी शाखा रोही व जमिनीवर वावरणारे पक्षी वर्षभर दिसत असत .
विद्यापीठामधिल वनक्षेत्र असंख्य अश्या वन्यप्रजातींचे नंदनवन आहे . या परिसरात कृष्ण गरुडची नोंद झाल्याने या परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले दिसते . मागील १५ दिवसांत दोनवेळा या पक्ष्याची नोंद झाली आहे या गरुडाचे वास्तव्य देखील विद्यापीठातील जैवविविधता अधोरेखित करते , असे पक्षीप्रेमी सपकाळे संरक्षण संस्थेचे राहुल रवींद्र फालक , बाळकृष्ण देवरे , सोनवणे , प्रसाद सोनवणे , अमन गुजर रवींद्र सोनवणे , योगेश गालफाडे , नीलेश ढाके , अजीम काजी , अरुण सपकाळे , विद्यापीठ परिसरात निरीक्षण व नोंदी ठेवणार आहेत