जळगाव – भुसावळ दरम्यानच्या महामार्गाच्या वापरासाठी आता वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहे . कारण उद्या म्हणजेच बुधवारपासून नशिराबादच्या काही अंतरावर असलेल्या सिमेंट फैक्टरीजवळील टोलनाका सुरु होणार आहे .
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दरांबद्दलची सार्वजनिक सूचना जारी केली आहे यात यामुळे कुठल्या वाहनासाठी किती दर आकारले जाईल , हे सविस्तर सांगीतले आहे
* जाणून घेऊया दर :
१) जीप , हलके मोटार , कार , प्रवासी कैन , वाहनाच्या एकेरी प्रवासाठी ८५ तर एका दिवसात परतीचा प्रवासाकरिता १३० रुपये आकारले जाणार आहे .
२) हलके मालवाहू तसेच वाणिज्य वाहनाच्या एकेरी प्रवासासाठी १४० रुपये तर परतीच्या प्रवासाकरिता २१० रुपये
३) ट्रक व बस एकेरी प्रवासाठी २१५ तर परतीच्या प्रवासाकरिता ४४० , खोदकाम करणारी , माती वाहून नेणारे उपकरणे तसेच जड बांधकाम यंत्रांच्या एकेरी ४६० व एका दिवसाच्या परतीचा प्रवासाकरिता ६ ९ ० रुपये आकारले जाणार आहे.
4) अवजड वाहनांना एकेरी प्रवासाठी ५६० रुपये मोजावे लागणार आहे .
* सूट कशी मिळणार जाणून घ्या :
१) सर्वप्रकारच्या वाहनासाठी टोलशुल्क भरल्याच्या तारखेपासून एका महिन्याकरिता ५० किंवा जास्त एकेरी प्रवास असल्यास त्यात ३३ टक्के सूट मिळणार आहे .
२) सर्व वाहनांसाठी टोल तिकीट घेतल्यापासून २४ तासांसाठीचा परतीच्या प्रवासाठी २५ टक्के सूट देण्यात आली
3) टोलनाक्याच्या २० कि.मी. हद्दीतील अवाणिज्य वाहनांसाठी कॅलेंडर महिन्यासाठी स्थानिक