उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क बंदी प्रकरणी मांडले विधान.

शेअर करा.

मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मास्क वापर करण्याच्या सूचना एआज्य सरकारच्यावतीने करण्यात आलेले आहेत . मास्क संबंधित उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे . आता कोरोनाचे प्रमाण हे कमी झाले असल्याने मास्क वापरण्याबाबतीत नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे .दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कबंदीबाबत मोठे विधान केलेले आहे . “ जोवर कोरोना जाणार नाही तोवर मास्क बंदी उठणार नाही , हे विधान पवार यांनी केले आहे .

 

आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व अजित पवार यांनकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात आली होती . यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद सोडला . यावेळी त्यांनी सांगितले की , अजून देखील नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही .

अजूनही कोरोना हा गेलेला नाही . यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर नियमितपणे करावा . मास्क काढायचा असेल त्यावेळी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू . तोपर्यंत मास्क घालणं आवश्यक आहे .

 

मुंबई हि चांगली दिसावी म्हणून उद्धव ठाकरे , राज्य मंत्रिमंडळ , आदित्य ठाकरे यांना वाटते . मुंबईत आज अनेक विकासकामे सुरू आहेत . महामंडळाच्या नियुक्तीमध्ये कोणती ही अडचण नाहीच . आज अनेक पक्ष नावे देत आहेत . यामुळे कोणतीही अडचण नाही . देशात व मुंबईत अन्य महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत , असेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply