• Tue. Aug 16th, 2022

    ऊस पिकावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव.

    थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेरसह परिसरातील भोरखेडा असली . अहिल्यापूर , आढे , वाठोडा ताजपुरी , गरताड , भोरटेक , भाटपुरा मांजरोद , पिळोदा , होळनांवे , बभळाज आदी भागातील ऊस पिकावर लोकरीमावावपांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे . यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहे . बदलत्या हवामानामुळे ऊस या पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे . मात्र , कृधी विभागामार्फत राबविण्यात येणारा कीड व्यवस्थापन कार्यक्रम , कृषी विषयक नियोजन व सल्ले यांच्या अभावामुळे परिसरातील शेतकन्यांना रोगांवर वेळेवर आवश्यक ती उपाययोजना करता येत नसल्यामुळे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे कृषी विभागाने ऊसावरील लोकरीमावा व पांढरी माशी यांच्यावर त्वरित उपाययोजना करावी , अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे . थाळनेरसह परिसरातील खांडवा व लावणीच्या ऊस पिकावर लोकरीमावा व पांढरी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे . यारोगांचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने उसाचे पीक अगोदर पांढरे व पिवळे होते . त्यानंतर उसाचा मधला पोगा कोरडा पडतो , हे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत जाऊन पूर्ण शेतातील उसाचे उभे पीक कोरडे पडते त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले दिसून येत आहे . थाळनेर परिसर तापी नदीच्या काठावर असल्यामुळे परिसरातील शेतामधील ट्युबवेलची पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात असते . म्हणून परिसरातील बरेचसे शेतकरी ऊसलागवडीस प्राधान्य देतात . मात्र , आता परिसरातील बहुतांश शेतकरी उसाची लागवड करण्यास नापसंती दर्शवित आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published.