एअर इंडियाची कमान आता टाटा समूहाकडे,अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट.

शेअर करा.

नवी दिल्ली हवाई वाहतूक कंपनी : एअर इंडिया या आठवड्याच्या शेवटी टाटा समूहाकडे सोपविली जाण्याची मोठीशक्यता आहे . वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती जाहीर केलेली आहे . सरकारने मागील वर्षी ८ ऑक्टोबरला १८,००० कोटी रुपयांच्या मोबदल्यात एअर इंडियाच्या विक्रीकरिता मंजुरी दिली आहे .

 

इंडिया बरोबरच, तिची परवडणारी एअरलाइन एअर इंडिया एअर एक्स्प्रेसची देखील हिस्सेदारी विकली जाणार आहे . याच बरोबर त्यांची देखभाल कंपनी एआयएसएटीएसची ५० टक्के हिस्सेदारी टाटा समूहाला दिली जाणार आहे याबाबतची हस्तांतरणाची औपचारिकता डिसेंबर शेवटपर्यंत पूर्ण होईल असे सरकारकडून सांगण्यात आलेले होते .

 

परंतु , त्यास एक महिना विलंब झाला पुढच्या काही दिवसांत या कराराची उर्वरित औपचारिकता पूर्ण होण्याची अपेक्षा दिसत असून , या आठवड्याच्या शेवटी विमान कंपनी टाटा समूहाकडे जाईल , असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply