• Tue. Aug 16th, 2022

  एअर इंडियाची कमान परत टाटांच्या हातात ,१८ हजार कोटीची लावली बोली.

  ByKhandeshTimes

  Oct 9, 2021

  नवी दिल्ली : सरकारी एअर इंडियाची : मालकी हि पुन्हा टाटा समूहाकडे परतली आहे . एअर इंडियासाठी टाटा सन्सने सर्वाधिक १८ हजार कोटींची बोली लावली गेली होती . यामुळे ६८ वर्षांनी महाराजा हा पुन्हा टाटांकडे परत केलेला दिसतो . स्पाईसजेटचे अजय सिंह यांची बोली ही १५ हजार १०० कोटी रुपये इतकी होती . त्यामुळे ते माघारी पडले . परंतु पुढील पाच वर्षे एअर इंडियाचे नाव व त्याच बरोबर लोगो बदलता येणार नाही .एअर इंडियाची विक्री करण्याकरीता केंद्र सरकारने डिसेंबर २०२० मध्ये एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले कळाले होते . एअर इंडियाकरिता सरकारने १२ हजार ९ ०६ कोटी अशी राखीव किंमत निश्चित केली होती .

  टाटांच्या टॅलेस प्रा . लिमिटेडने लावलेली बोली ही सर्वात जास्त ठरली . गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने यावर शेवटचा निर्णय घेतला . टाटा समूहाला १५ हजार ३०० कोटींच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारावे लागणार असून , उर्वरित रक्कम ही रोख भरावी लागेल . टाटांकडे विस्तारा तसेच एअर एशिया या कंपन्या असून , एअर इंडियामुळे टाटांकडे देशाच्या अंतर्गत बाजारपेठेतील वाटा २६.९ टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.