पुणे : एकतर्फी प्रेमाप्रकरणी बिबवेवाडीत यश लॉन्स येथे १४ वर्षीय असलेल्या मुलीचा धारदार अशा शस्त्राने गळा चिरडून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे . क्षितिजा अनंत व्यवहारे ( १४ रा . व्हीआयटी कॉलेज अप्पर बिबवेवाडी , पुणे ) हे खून झालेल्या मुलीचे नाव आहे . यादरम्यान ,आरोपीने वार केल्याने मुलीचे शिर हे धडापासून वेगळे झाले होते .
क्षितिजा ही तिच्या कब्बडीच्या सरावाकरिता बिबेवाडीमधील यश लॉन्स या परिसरात इतर मैत्रिणींसोबत गेली होती . मंगळवारच्या संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिच्याच नात्यात असणारा मुलगा शुभम त्याच्या तीन साथीदारांसोबत येऊन तिच्याशी संवाद साधत होता .यानंतर वाद होऊन त्याने तिच्या सोबतच्या मैत्रीणींसमोरच त्यांना कोयता दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर कोयत्याने तिचा गळा चिरडून काढला . या घटनेत क्षितिजाचा जागच्याजागी मृत्यू झाला . आरोपीने तिचा गळ्यावर पूर्ण ताकदीने वार केल्याने तिचे शिर धडापासून वेगळे जाऊन पडले . या घटनेच्या नंतर आरोपी पसार झाला असून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे . एकतर्फी असलेल्या प्रेमातून हा खून झाल्याचे कळाले आहे .