• Tue. Aug 16th, 2022

  एकाच जणाच्या दोन पत्न्यांनी पोटनिवडणुकीत मारली बाजी.

  ByKhandeshTimes

  Dec 24, 2021

  कुरंगी , पाचोरा : स्वप्न पडत असताना काहींची खरी ठरतात , तर काहींची स्वप्न हे स्वप्नच राहून जातात . एका पतीने आपल्या प्रथम पत्नीला श्रामपंचायत सदस्य केल्यानंतर गावामध्ये पोटनिवडणुकीची आलेली संधी साधून ताकतवर विरोधकाशी टक्कर देत दुसऱ्या पत्नीलाही ग्रामपंचायत सदस्य केले आहे . पहाण ( ता . पाचोरा ) या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये पूनम ज्ञानेश्वर पाटील या सदस्याचे आकस्मिक असे निधन झाले होते . याकरीता रिक्त झालेल्या एका जागेकरीता चार उमेदवार हे निवडणूक गोलात उतरले होते .

   

  पहिल्या पत्नीला मूल नसल्या कारणाने पत्नीनेच त्यांना दुसरे लग्न करायला सांगितले . द्वितीय पत्नी संध्या विलास यांना २०२०-२१च्या मत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष म्हणून वॉर्ड क्रमांक ३ मधून १८३ मते प्राप्त करून विरोधकाला फक्त ६३ मते देत धडाकेबाज विजय मिळवला . नऊ सदस्य असणाऱ्या संचालकांपैकी पूनम पाटील यांचे आकस्मिक स्वरुपात निधन झाल्याने त्याच्या जागेवर पोटनिवडणूक लागली . त्यांच्या जागी पुन्हा पहिली पत्नी ममता पाटील यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत आणले गेले . विरोधक बलाढ्य असताना विलास पाटील यांनी आपले स्वप्न पूर्ण करत दुसऱ्या पत्नीला देखील विजय मिळवून दिला . विलास सुभाष पाटील हे गावांमधील शिवसेना शाखाप्रमुख आहेत . त्यांच्या दोघ पत्नी ग्रामपंचायत सदस्य झाल्याने गाव परिसरात रंगतदार चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे .

   

  पहिली पत्नी पोटनिवडणुकीत सर्वसाधारण स्त्री या आरक्षणातून निवडून आल्या होत्या , तर दुसरी पत्नी संध्या पाटील यांनी सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक केली होती. ममता पाटील या अनुसूचि लढवली होती . यासाठी मला माजी सरपंच भगवान पाटील , एकनाथ अहिरे , माजी उपसरपंच उमाकांत पाटील , राजेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले , असे त्यांनी स्पष्ट केले आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.