जामनेर : तालुक्यामधील कापूसवाडी आणि जामनेर येथील दोन वेगवेगळ्या महिलांच्या आधार कार्ड वरील क्रमांका मात्र सारखाच असल्याचा आश्चर्यजनक असा प्रकार समोर आला आहे . स्वस्त धान्य मिळवण्याकरिता जामनेर येथील महिलेने शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता दुकानदाराकडे आधार क्रमांक दिला असताना त्याच क्रमांकावर दुसरीच महिला लाभ घेत असल्याचे समोर आल्याने हा गोंधळ उघड झाला . हा आगळावेगळा मामला आता पुरवठा विभागाकडे पोहोचला असून यातून मार्ग कसा काढता येईल , अशा पेचात आता पुरवठा विभाग पडलेला आहे
चौकशीतून सत्य समोर यावे याकरिता सध्या खात्याबरोबरचशासनाच्या इतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीदेखील आधार क्रमांक हा जोडावा लागत असल्याने हा प्रकार घडून आला परंतु यामुळेच मोठा घोळ होऊ शकतो हे नाकारत येत नाही . बनावट आधार कार्डचे रॅकेट देखील यातून समोर येण्याची शक्यता आहे . गैरफायदा घेतला जाण्याचीही शक्यता असल्याने प्रशासनाने यावर सखोल चौकशी करावी , अशी मागणी केली जात आहे . शहरात यापूर्वी दिव्यांगांना बनावट ओळखपत्र बनवून देणाऱ्याचे रॅकेट समोर आले होते . अंत्योदयसह काही योजनांचा लाभ पात्र नसलेले नागरिकदेखील या बनावटी कागदामुळे योजनांचा लाभ घेऊ शकत होते