एमआयडीसी मध्ये चोरी ते पन कुटुंब घरात असतांना.

जळगाव : एमआयडीसीतील फातेमा नगरात इम्रान शरीफ खान ( ३६ ) यांच्या उघड्या घरातून मध्यरात्री साडेआठ हजार रुपये रोख दोन मोबाईल लांबविणाऱ्या शेख मोसीन ऊर्फ दत्ता शेख हमीद ( २८ , रा.मास्टर कॉलनी , मूळ रा.अडावद ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मास्टर कॉलनीतून अटक केली . त्याच्याकडून चोरीचे मोबाईल व दोन हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत . ३० मे रोजी रात्री वीजपुरवठा खंडीत झाल्याने इम्रान खान यांनी घराचादरवाजा उघडा केला होता . त्यानंतर कुटुंब झोपून गेले . पहाटेच्या सुमारास घरातील दोन्ही मोबाईल व कपाटातील रोकड गायब झाल्याचे उघडकीस आले . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . दरम्यान , ही चोरी शेख मोसीन व हमीदखान अय्युब खान ( रा.गणेशपुरी ) या दोघांनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील , जितेंद्र पाटील , सुधाकर अंभोरे अकरम शेख , नितीन बाविस्कर , प्रीतम पाटील , राहुल पाटील व राजेंद्र सोनार यांनी दोघांचा शोध घेतला असता शुक्रवारी शेख मोसीन सापडला तर त्याचा साथीदार अजून सापडलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.