• Tue. Aug 16th, 2022

  एसटी तिकिट दरात 17 टक्क्यांनपर्यंतची वाढ, एसटीच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी वाचा सविस्तर माहिती.

  ByKhandeshTimes

  Oct 24, 2021

  मुंबई : सुरुवातीलाच पेट्रोल – डिझेलच्या किमती वाढलेल्या असून आता सर्वसामान्यांच्या संकटांमध्ये भर पडणार असल्याची शक्यता आहे . कारण हळूहळू इंधन दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (ST) मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे . हा तोटा भरून काढण्याकरिता एसटी तिकिटांच्या दरात 17 टक्क्यांन पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे . हा प्रस्वात महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी कळविली आहे .

   

  भाडेवाढीकरिता राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती निर्माण करण्यात आली आहे . समितीचा अहवाल हा महामंडळाच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात येणार असल्याचे कळाले आहे . एसटी विभागाला आतापर्यंत 12500 कोटी इतक्या रुपयांचा संचित तोटा झाला आहे . याच बरोबर कोट्यवधांची देणी देखील शिल्लक आहेत . डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे खर्चात वाढ झाली आहे . कोरोनाकाळामध्ये प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे . त्यामुळे 12 तास काम करून देखील कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले गेले आहेत .

   

  हकीम समितीच्या शिफारशीप्रमाणे महागाईच्या आधारावर भाडेवाढ होत असल्यामुळे , डिझेलचे दर हे दहा टक्क्यापेक्षा अधिक वाढल्यास , टायरचे दर , कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व सुटे भागांच्या दरातील वाढीच्या निकषांचा अभ्यास केला जात असतो . जून 2018 मध्ये करण्यात आलेली शेवटची भाडेवाढ ज्या निकषांवर करण्यात आली . त्याचादेखिल अभ्यास केला जाणार असल्याचे कळाले आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.