ऐन वेळेस शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला ; पुराच्या पाण्याने खरीप हंगामाचे नुकसान.

शेअर करा.

यावेळेस झालेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . मात्र , अतिवृष्टीमुळे शिवारातून वाहणाऱ्या लहान व मोठ्या नाल्यांना आलेल्या पुराने काठांवरील हजारो एकर शेतीची खूप मोठी हानी झाली आहे . कापसासह सोयाबीन , मका , ज्वारी , केळी , ऊस , पपई आदी पिकांवर पाणी फेरल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे . सुरुवातीच्या बहुतांश नक्षत्रात जेमतेम पाऊस झाल्याने पेरणीनंतर उगवलेल्या खरिप पिकांचे अस्तित्व धोक्यात आले होते . पिके ऊन धरू लागल्याने शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल वाढली होती . श्रावणाततरी दमदार पाऊस होईल व खरिपाला जीवदान मिळेल , या आशेवर शेतकरी प्रत्येक दिवस काढत होते सुदैवाने उशिरा का होईना दमदार पावसाचे आगमन झाले आणि शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला अर्धा अधिक पावसाळा संपला तरी शेतांमधून पाणी बाहेर निघाले नव्हते . मात्र , श्रावणाच्या शेवटच्या टण्यात व नंतर पडलेल्या पावसाने सर्व ओढे – नाले तुडुंब भरून निघाले पुराचे पाणी पसरल्याने हजारो एकर शेतीवर लोट फिरून मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply