ऑगस्टमध्येही पर्जन्यमान झाले कमी; केवळ सहा दिवस पाऊस.

यंदा पावसाळ्याचा तिसरा महिना संपत येत आहे तरीही पावसाची टंचाई मात्र कायम आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात केवळ ८ दिवस पर्जन्यमान होते . ऑगस्ट महिन्यात गेल्या २५ दिवसांमध्ये केवळ सहा दिवसच सरासरी पाऊस झालेला आहे . यंदा पावसाबाबत हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्थांचे अंदाज सपशेल चुकीचे ठरले आहेत .

जून , जुलै आणि पाठोपाठ ऑगस्ट महिनाही कमी पर्जन्याचा ठरला आहे . जुलै महिन्यात पावसाची तूट ४० टक्क्यांवर होती . एकूण ३१ दिवसांपैकी १८ दिवस तुरळक दिवस पाऊस होता . तर इतर कोरडेच गेले . ऑगस्ट महिन्यात दोन आठवडे पाऊसच नव्हता . गेल्या आठवड्यात ६ दिवस पाऊस झाला ऑगस्ट महिन्यातील २५ पैकी अवघे ६ दिवस पाऊस झालेला आहे . पावसाच्या तुटीचे दिवस वाढल्याने त्याचा थेट खरिपाच्या पिकांवर आणि प्रकल्प साठ्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.