• Tue. Aug 16th, 2022

    ऑनलाइन ॲप्लिकेशन पाठवून प्राचार्यांची ३६ हजारांत फसवणूक ? पण कशी जाणून घ्या.

    ऑनलाईन पद्धतीने फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना पुन्हा आणखी नविन प्रकार समोर आला आहे . फसवणूक करणाऱ्याने व्हॉट्सॲपवर ऑनलाइन ॲप्लिकेशन पाठवून काही सेकंदातच संबंधित मोबाइल धारकाच्या खात्यातून ३६ हजार ७०० रुपये परस्पर वळवल्याचा प्रकार १ सप्टेबर रोजी शहरात घडला . यात वयोवृद्ध फसवणूक झाली आहे . अशोक फकिरराव साळुंखे ( वय ७४ ) यांची फसवणूक झाली आहे . साळुंखे हे धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील एम . . शिंदे विद्यालयातून प्राचार्य पदावरून २००६ मध्ये निवृत्त झालेले आहेत . त्यांची पेन्शनची रक्कम जळगाव शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेतील बँक खात्यात जमा होते . १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सॲपवर नंबरवर अज्ञात व्यक्तीने हाय असा मॅसेज पाठवला . यानंतर एपीके नावाचा आयकॉनची फाइल ( ऑनलाइन ॲप्लिकेशन ) पाठवली . त्यावर ओपन व क्लोज असे दोन पर्याय होते . साळुखे त्यांनी ती फाइल ओपन केली असता फाइल ओपन होऊन आपोआप बंद झाली . त्यानंतर काही मिनिटांतच साळुखे यांच्या बँक खात्यातून अनुक्रमे ३ हजार ७०० , २० हजार ,१३ हजार असे एकूण ३६ हजार ७०० रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग झाले . साळुखे यांनी तातडीने बँकेत जाऊन चौकशी केली असता उत्तराखंडातील एका व्यक्तीच्या खात्यात ही रक्कम वर्ग झाल्याचे समोर आले . फसवणूक झाल्याने साळुंखे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे . त्यामुळे पोलीस याचा तपास करत आहे

    Leave a Reply

    Your email address will not be published.