ओटीटी प्लॅटफॉर्म शिक्षणासाठी.

वरणगाव : येथील रोहित सुनील जैन ( बीटेक आयटी ) या युवकाने भारतातील शिक्षण क्षेत्रातील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित केला आहे . त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अधिक सुविधा उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे . आतापर्यंत चित्रपट , मालिका , खेळाचे सामने इ . पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध होता . परंतु शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर पर्याय उपलब्ध नव्हता . त्यासाठी येथील रोहितजैन यांनी शिक्षण क्षेत्रातील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित केला आहे . या प्लॅटफॉर्मवर दुसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे शिक्षण मोफत मिळणार आहे . सध्या अगम अॅप्लाय नावाने ओटीटी प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेला आहे . यासाठीकोणत्याही प्रकारची युजर्सकडून फी किंवा रजिस्ट्रेशन चार्ज घेतले जाणार नाहीत , अशी माहिती रोहित यांनी दिली . त्यांचे शिक्षण उच्च शिक्षण राजस्थान कोटा येथे केले.तर सोमय्या कॉलेज मुंबई येथे बी.टेक व आय.टी.चे शिक्षण पूर्ण केले आहे .
ओटीटी म्हणजे काय ?
 ओव्हर द टॉप … आपण घरी असलेल्या टीव्ही वर मालिका , चित्रपट किवा कार्यक्रम बघतो त्यासाठी केबल अथवा डिश जोडणे महत्त्वाचे असते . याउलट ओटीटी साठी अशा कुठल्याच जोडणीची गरज नसते . तर पूर्णपणे इंटरनेटचा वापर करून हे चालवले जाते . आपल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरून ओटीटी वापरता येते . या वर असणाऱ्या मालिका , चित्रपट किवा कार्यक्रम बघण्यासाठी महिन्याचे किंवा वर्षांचे पैसे भरावे लागतात . परंतु जैन याने विकसित केलेल्या ओटीटी साठी कुठलीच फी न भरता विद्यार्थी आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटर वर आवश्यक अभ्यासक्रम अगदी मोफत शिकता येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published.