• Tue. Aug 16th, 2022

    ओबीसी,व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती.

    ByKhandeshTimes

    Oct 31, 2021

    मुंबई : विजय वडेट्टीवार हे बहुजन कल्याण मंत्री यांनी दाखवलेल्या पुढाकाराने ओबीसी , व्हीजेएनटी , एसबीसी , प्रवर्गा मधील दहावीच्या पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याकरिता २ ९ २ कोटी ८१ लाख ८५ हजार इतक्यारुपयांना शासनाकडून मंजुरी मिळाली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

     

    ओबीसी , व्हीजेएनटी , एसबीसी प्रवर्गातील दहावीच्या नंतरचे उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेली ही रक्कम MAHADBT या प्रणालीद्वारे वितरित केली जाणार असल्याचे कळाले आहे . याआधी ४३६ कोटी इतकी रक्कम वितरित करण्यास सप्टेंबरमध्ये मान्यता मिळाली होती . ही रक्कम संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा केली गेली असल्याची माहिती श्री . वडेट्टीवार यांनी दिलेली आहे .राज्य शासनाच्या बहुजन कल्याण विभागा यांच्या वतीने ओबीसी , एसबीसी , व्हीजेएनटी या सर्व प्रवर्गातील मुलामुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती दिली जाते . शिष्यवृत्ती देण्यासाठी २ ९ २ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपयांची मंजुरी मिळाल्याने विद्यार्थ्यांकडून मंत्री श्री . वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त केले जात आहेत .

    Leave a Reply

    Your email address will not be published.