• Tue. Aug 16th, 2022

  ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण बरा झाला.

  ByKhandeshTimes

  Dec 9, 2021

  Khandeshtimes News कल्याण ( ठाणे ) : दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेल्या ३२ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते . आरटीपीसीआर टेस्टमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला बुधवारी सुट्टी देण्यात आली . ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण बरा होण्याचे हे देशातील पहिलेच उदाहरण असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे . हा रुग्ण त्याच्या वाढदिवशीच बरा होऊन घरी गेल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ . विजय सूर्यवंशी यांनी दिली .

  हा प्रवासी केपटाऊनहून दुबई , दिल्ली ते मुंबई असा प्रवास करून डोंबिवलीत दाखल झाला होता . २६ तारखेला तो मुंबईहून डोंबिवलीत प्रवास करून आला होता . ताप आल्याने त्याने डॉक्टरकडे तपासणी केली असता , त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती . त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगकरिता पाठविले असता , त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता .

  Leave a Reply

  Your email address will not be published.