कटऑफ वाढल्यामुळे मोठी चुरस :अकरावीच्या पहिल्या यादीतील प्रवेशासाठी आज आहे अंतिम मुदत ; दुसऱ्या यादीची प्रतीक्षा

शेअर करा.

जळगाव : यावेळेस अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीनंतर आता प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागली आहे . शुक्रवारी पहिली यादी जाहीर झाल्यानंतर यातील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुटीचा दिवस सोडून पाच दिवसांचा अवधी देण्यात आला होता याअंतर्गत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून प्रवेश निश्चित केला आहे . दरम्यान , बुधवारी दुसरी यादी जाहीर होईल .

यंदा कटऑफ टक्क्यांवर अवलंबून आहे . त्यामुळे विज्ञान शाखेसाठी चुरस आहे . दहावी निकालानंतर अकरावी प्रवेशाचा तिढा आता सुटत चालला आहे . मेरिटनुसार यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे . पहिल्या यादीतील कटऑफ खाली येऊन आता कमी होणार आहे . त्यामुळे पहिल्या यादीत नंबर न लागलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत संधी मिळू शकणार आहे . तसेच , पहिल्या एक ते दोन मध्येच विद्यार्थ्यांच्या पसंतीस पडलेल्या नामांकित महाविद्यालयातील प्रवेशाचा कोटा पूर्ण होणे शक्य आहे . शहरातील केसीई सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार अखेरपर्यंत विज्ञान शाखेच्या ७०४ , वाणिज्य शाखेसाठी ६०५ व कला शाखेसाठी १२ ९ प्रवेश निश्चित झाले आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply