• Tue. Aug 16th, 2022

  कपाशीच्या निर्यातीला या वेळेस बसणार ‘ ब्रेक ‘ जळगाव.

  ByKhandeshTimes

  Aug 23, 2021

  कपाशीच्या निर्यातीला यंदा बसणार ‘ ब्रेक ‘ जळगाव : यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे कपाशीचे उत्पादन चांगले येईल , अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे . देशातील कापूस उत्पादनाचा विचार करता भारतात तीन कोटी ४० लाख कपाशीच्या गाठींचे उत्पादन होते . त्यापैकी तीन कोटी २० लाख गाठी विविध प्रक्रियेसाठी भारतातच लागतील , असा अंदाज असल्याची माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली . पाऊस चांगला होत असल्याने पिकांना जीवदान मिळणार आहे . सध्या कपाशीला साडेसहा ते सात हजारांचा भाव आहे . कारण बाजारपेठेत कापूस नाही . बाजारात कापूस आल्यानंतर या दरात फरक पडणार नाही . यंदा शासकीय सीसीआय , पणन महासंघ कपाशीला सहा हजारांपर्यंत भाव देतील . व्यापारी मात्र साडेसहा हजारांचा दर देऊन शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करतील , अशी शक्यता आहे .दुसरीकडे भारतात यंदा कापड निमिर्तीसह मेडिकल क्षेत्रात कपाशीला प्रचंड मागणी आहे . सूतगिरण्या , जिनिंगमध्ये कपाशीला मागणी राहील . यामुळे रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल , असे सकारात्मक चित्र सध्या तरी आहे . मात्र , पावसावर सारे काही अवलंबून आहे . आगामी काळात पाऊस कसा पडतो , यावर हे सर्व गणित आहे . सीसीआय , पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो . मात्र , दोन ते तीन दिवस रांगेत उभे राहावे लागते . ऑनलाइन नोंदणीची अट , नंतर प्रत्यक्ष कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर मनमानीप्रमाणे कटती लावतात . त्यात आर्थिक नुकसान होते . यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना दोन पैसे कमी दराने कापूस देतात व लागलीच त्याचे पेमेंटही घेतात . शासकीय कापूस खरेदीत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीवर उपाययोजनांची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .

  Leave a Reply

  Your email address will not be published.