कमला इमारती आगीच्या लपटेमध्ये, रहिवाशांचा झाला मृत्यू मुंबई येथील घटना.

शेअर करा.

मुंबई : ताडदेव परिसरा मधील नाना चौकाजवळ असणाऱ्या कमला या २० मजली असणाऱ्या इमारतीला शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास भीषण स्वरूपाची आग लागून तेथील रहिवाशांचा मृत्यू झाला.

 

या घटनेमध्ये २४ जण जखमी झाले . रहिवासी हे गुड झोपेत असतानाच ही दुर्घटना घडली . अग्निशमन दलाच्या १३ गाड्यांनी आग कंट्रोल मध्ये आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले . १८ व्या मजल्यावर तीन ते चार फ्लॅटचे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून १५ व्या मजल्यापासून २० व्या मजल्यापर्यंत प्रचंड प्रमाण प्रमाणात धूर पसरला होता .

 

अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्ण इमारत रिकामी करीत रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेले जखमींना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . यापैकी ७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे , तर १६ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत या घटनेच्या चौकशीसाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केलेली आहे पुढील १५ दिवसांत समिती आपला अहवाल सादर करणार आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply