इंदोर : स्वतःच्या करोडपती पतीला सोडून १३ वर्षीय असलेले रिक्षाचालकासह पळून गेलेली महिला ही पुन्हा घरी परतली आहे . तिच्या डोक्या मधील प्रेमाचं भूत निघून गेलं व आता तिला पुन्हा नवऱ्यासोबत राहायचं आहे .आधी तिने घरातून चोरून नेलेल्या 47 लाख रोकड पैकी 13 लाख तिच्या प्रियकराबरोबर खर्च केले . व बाकी उरलेली रक्कम ही तिच्या प्रियकराच्या मित्रांकडून आधीच वसूल केले गेले आहेत.
इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशन या परिसरात राहत असलेले जमीन व्यापाऱ्याची पत्नी २६ दिवसांपूर्वी ४७ लाख रुपये लांबवूण घरातून फरार झालेली होती .नंतर त्या परिसरातील एक ऑटोचालकही देखील बेपत्ता झाला होता . महिला ऑटोचालकासोबत गेली असल्याची भीती घरच्यांनी व्यक्त केली . मागील अनेक दिवसांपासून दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या खबरी कॉमन होत होत्या . पोलिसांनी याबाबत शोध घेतला असता ऑटोचालकाच्या मित्रांकडून सुमारे तीस लाख रुपये जप्त केले असले तरी ऑटोचालकाचा शोध लागू शकला नाही . आता अचानक तब्बल २६ दिवसांनी ती महिला स्वतःहून तिच्या घरी पोहोचली .
सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे , पोलिसांच्या कठोरतेनंतर या महिलेने सत्य सर्वांसमोर आणले . तुझ्या माहितीनुसार ती तिच्या पतीवर नाराज होती व तिची इम्रानशी जवळीक दिवसेंदिवस वाढत होती . या कारणाने दोघांनी एकत्र पळून जाण्याचा निर्णय घेतला . दोघ हे नेहमी शहर बदलत राहिले . परंतु आता पैसे संपू लागल्यामुळे इमराननेच महिलेला अजमेरहून बसने इंदूरला रवाना केले . परंतु , महिला घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला सोबत राहू देण्याचे मान्य केले आहे .