कर्जबाजारी महिला शेतकऱ्याने विहिरीमध्ये उडी मारून केली आत्महत्या.

शेअर करा.

अमळनेर : तालुक्यामध्ये मेहेरगाव या ठिकाण च्या एका ४७ • वर्षीय कर्जबाजारी असलेल्या महिला शेतकऱ्याने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली असल्याचे घटना २१ रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास घडली . कोकीळाबाई संजय पाटील ( ४७ ) हे या मृत महिलेचे नाव आहे . मेहेरगाव याठिकाणच्या कोकीळाबाई संजय पाटील या महिलेने पिळोदा याठिकाणी सुधाकर दत्तात्रय साळुंखे यांच्या मेहेरगाव शिवारामधील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे .

 

एकर कोकिळा बाई यांच्याकडे ७ शेती होती . त्यांच्यावर सोसायटीचे दोन लाख पीक कर्ज तर खासगी सावकाराचे चार ते पाच लाख रुपये कर्ज होते . यामुळे त्या त्रस्त होत्या . कर्ज कसे फेडायचे याची त्यांच्यापुढे चिंता होती . कर्जापोटी विकली शेती कर्ज फेडावे लागणार म्हणून त्यांनी गेल्या वर्षी शेती विकली गेली होती . त्यानंतर त्या अधिकच अस्वस्थ असत . कर्जापोटी कोकीळाबाईने आत्महत्या केल्याचे सरपंच राकेश ठाकरे यांनी सांगितले . महिलेचे दिर सुरेश देविदास पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . कोकीळाबाईचे शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे . तिच्या पश्चत पती व दोन अविवाहित मुले असा परिवार आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply