कर वाचवण्याचे हे ४ उपाय जाणून व्हाल हैराण, कायदेशीर पद्धतीने होईल बचत

शेअर करा.

१)वैयक्तिक खर्च दाखवा • सर्व वैयक्तिक खर्च तुम्हाला कर वाचवण्यासाठी मदत करू शकतात . स्वतःसाठी व मुलांसाठी शिक्षण स्वत : साठी किंवा जोडीदारासाठी किंवा मुलांकरिता विमा प्रीमियम भरणे , तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या वैद्यकीय तपासणी , उपचारावर केलेल्या खर्चावर कुटुंबातील व्यक्तींसाठी करून ठेवलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या खर्चातून आपण करामध्ये सूट मिळवू शकतो .

२)गृहकर्जाचा विचार करा गृहकर्जावरील मूळ रक्कम व त्यावरील व्याज यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात कर पाठवू शकतात याकरिता तुम्ही ८० सी च्या अंतर्गत करामध्ये सूट मिळवून देण्याची मागणी करू शकता गृहकर्जावर २ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते

३)शैक्षणिक कर्ज शैक्षणिक कर्जाच्या व्याज परतफेडीवर संपूर्ण कर सवलत ही केंद्र सरकारने दिलेली आहे . शिक्षणावरील कर्जाची रक्कम किती असावा याकरिता सरकारने निश्चित केलेली नाही . शैक्षणिक कर्जाच्या जास्तीत जास्त माध्यमातून कर बचत करण्याचे लाभ मिळविण्यासाठी अनुभवी व्यक्तीशी सल्ला घेतलेला बरा .

४)सरकारी गुंतवणूक करा कलम ८० सी च्या अंतर्गत आपण दीड लाख रुपयांपर्यंतचा प्राप्तिकर वाचवू शकतो .आता ही मर्यादा दोन लाख रुपये करण्याची मागणी केलेली आहे ८० सी च्या अंतर्गत आपण ईपीएफ , पीपीएफ , इक्विटी लिक्ड सेव्हिंग स्कीम ( ईएलएसएस ) , सुकन्या समृद्धी योजना , टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट , नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट , ज्येष्ठ नागरिक बचत यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply