• Tue. Aug 16th, 2022

  काँग्रेसचे नवाब मलिक यांना आले धमकी भरलेले पत्र,गप्प बसा नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू या भाषेत दिली धमकी

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे एक पत्र प्राप्त झालेली आहे . नवाब मालिक व त्यांच्या सर्व कुटुंबियांना मारून टाकण्याची धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे . अत्यंत अश्लील स्वरूपाच्या भाषेत हे पत्र पाठवले असल्याने या प्रकरणाबाबत मालिक यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे .

  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पाठविले गेलेले हे पत्र यामध्ये वाईट भाषा वापरण्यात आल्याचे कळाले आहे . गप्प बसा नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू , याप्रकारची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे . संबंधीत पत्र हे मुंबईतील कफ परेड इथे स्थायिक असणारे अभिजित बनसोडे याने पत्र पाठवले आहे . परंतु पत्र पुण्यावरून पोस्टाने आल्यामुळे चुकीच्या नावाने पत्र पाठवले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

  मलिक यांच्याकडून अनेक दिवसांपासून NCB अधिकारी समीर वानखेडे यांवर आरोप केले जात आहेत . तसेच मलिक दररोज पत्रकर परिषदेच्या माध्यमातून समीर वानखेडे त्या बरोबर आर्यन प्रकरण याबाबत नवनवीन खुलासे करायला लागले आहेत . त्याच अनुषंगाने मलिकांना पत्र पाठविले गेले आहे . समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलणे थांबवा हे देखील त्या पत्रात म्हटले आहे . आता मलिकांनी या संबंधीत तक्रार गृहमंत्र्यांकडे केली आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.